Get Mystery Box with random crypto!

लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_sex_diseases — लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_sex_diseases — लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕
चैनल का पता: @marathi_sex_diseases
श्रेणियाँ: स्वास्थ्य , प्रेमकाव्य
भाषा: हिंदी
ग्राहकों: 968
चैनल से विवरण

तुमच्या लैंगिक समस्या व त्यांचे समाधान...!
मुख्य चॅनेल - @sex_marathi

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2021-12-01 10:28:24
आज जागतीक एड्स दिवस आहे, तुम्हाला माहिती आहे का? Today is World AIDS Day, you know?
Anonymous Poll
76%
हो/yes
18%
नाही/no
6%
आता माहीत झाले/now I know
273 voters188 views07:28
ओपन / कमेंट
2021-11-26 10:47:25
Would you like to have intercourse in Car? / तुम्हाला गाडीमध्ये संभोग करायला आवडेल? / आपको कार के अंदर संभोग करने मैं रुची हैं?
Anonymous Poll
76%
Yes/हो/हा
13%
No/नाही/नही
11%
Never Think/विचार नाही केला/कभी सोचा नाही
568 voters160 views07:47
ओपन / कमेंट
2021-11-08 15:30:07
412 views12:30
ओपन / कमेंट
2021-10-25 00:40:43
जेव्हा तुम्हाला मानसिक ताण असतो तेव्हा तुम्ही हस्त मैथुन करून मनशांती मिळवता?/ When you have mental stress, do you get peace of mind by masturbating?
Anonymous Poll
67%
हो/yes
17%
नाही/no
8%
कधी प्रयत्न नाही केलं/never tried
8%
माहीत नाही/don't know
1.8K voters306 views21:40
ओपन / कमेंट
2021-09-08 11:25:09
तुमच्या सर्वांच्या महिती साठी..
750 views08:25
ओपन / कमेंट
2021-07-20 12:30:04 ‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B

‘अ’ प्रकारची कावीळ अन्नमार्गातून पसरते. तर ब आणि क प्रकारची कावीळ रक्तावाटे (दूषित इंजेक्शने, दूषित रक्त, इ.) आणि लैंगिक संबंधातूनही पसरते असे सिध्द झाले आहे. या प्रकारच्या काविळीचे स्वरूप सौम्य पण यकृताच्या दृष्टीने घातक असते. यापासून काही रुग्णांना कायमचा यकृतविकार जडतो. यामुळे पुढे जलोदर, कर्करोग, इत्यादी होऊ शकतात. हे आजारही एड्ससारखेच धोकादायक आहेत.

लक्षणं

ब काविळीची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींमध्ये काही ना काही लक्षणं दिसतात. मात्र ३० टक्के व्यक्तींमध्ये कुठलीच लक्षणं दिसत नाहीत तरीही त्यांच्यामध्ये विषाणू असतो. ब काविळीची लक्षणं जंतुलागण झाल्यापासून ६ आठवडे ते ६ महिन्याच्या आत दिसायला लागतात. ताप आणि थकवा ही मुख्य लक्षणं आहेत. काही जणांना मळमळ, उलट्या, जुलाब, भूक मंदावणे, वजन घटणे अशीही लक्षणं जाणवतात. पोटदुखी, गडद रंगाची लघवी, सांधेदुखी आणि काविळीप्रमाणे पिवळसर त्वचा आणि डोळ्याचा रंग पिवळा होणे अशीही लक्षणं दिसू शकतात.

निदान कसं करायचं?

ब काविळीची लागण झाली आहे अशी शंका असेल तर दोन महिने वाट पाहून रक्त तपासणी केली जाते. जुनाट किंवा क्रॉनिक प्रकारची ब काविळ असेल तर रक्त तपासणीबरोबरच यकृतावर काय दुष्परिणाम झाले आहेत किंवा यकृताचा कर्करोग आहे का हे पाहण्यासाठी अल्ट्रासाउंड सोनोग्राफी आणि बायोप्सीसारख्या इतर तपासण्या करण्यात येतात.

उपचार

९५ टक्के लोकांमध्ये ब काविळीचा विषाणू कोणत्याही उपचाराशिवाय किंवा लसीशिवाय दोन महिन्यांमध्ये शरीरातून निघून जातो. मात्र या दरम्यानच्या काळात इतरांना या जंतुची लागण लैंगिक संबंधांद्वारे किंवा रक्तावाटे होऊ शकते. उरलेल्या ५ टक्के लोकांमध्ये मात्र विषाणू निकामी होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे यकृताचा कर्करोग होऊ शकतो, यकृत निकामी होऊ शकते आणि त्यातून मृत्यू ओढवू शकतो.

हे समजून घ्या

ब प्रकारची कावीळ लक्षात आली नाही तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रक्त तपासणी करून घेणं फायद्याचंच ठरतं.
5.7K views09:30
ओपन / कमेंट
2021-07-15 12:30:01 योनीमार्ग सैल झाला असेल तर … केगेल व्यायाम
योनीमार्गाचे स्नायू बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, वारंवारचे गर्भपात किंवा कष्टाच्या कामामुळे सैल पडतात. केगेल व्यायामामुळे स्नायूंमध्ये घट्टपणा यायला मदत होते. लैंगिक संबंधांमध्ये स्त्रियांना लैंगिक आनंदही मिळू शकतो. खबरदारी हीच की योग्य ते स्नायू ओळखा. पोटाचे स्नायू आत ओढून उपयोग नाही.

डॉ. केगेल यांनी १९४८ मध्ये या व्यायामांबद्दल पहिल्यांदा माहिती द्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या नावावरूनच हे व्यायाम प्रकार ओळखले जातात.

योनीमार्ग, मूत्रद्वार आणि गुदद्वार या तीनही मार्गांच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये घट्टपणा आणण्यासाठी, सैलपणा कमी करण्यासाठी हा व्यायाम केला जातो. लघवीवरचा ताबा कमी झाला असल्यास, योनीमार्ग सैल झाला असेल तर, गर्भाशय बाहेर यायला सुरुवात झाली असेल किंवा शौचावरचा ताबा कमी झाला असेल तर त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे व्यायाम उपयोगी आहेत.
केगेल व्यायाम करण्याची पद्धत –

सुरुवातीला कोणते स्नायू रोखून ठेवायचे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी लघवी करत असताना ती मध्येच थांबवा, रोखून धरा. त्यासाठी ज्या स्नायूंचा वापर होतो ते स्नायू केगेल व्यायामाशी संबंधित आहेत.

व्यायामाचे टप्पे-

योग्य स्नायू ओळखा
पाच सेकंद स्नायू आतमध्ये रोखून धरा. मग पाच सेकंद स्नायू शिथिल करा. हीच कृती चार-पाच वेळा करा.
एकदा हे करायला जमलं की स्नायू आत ओढून घेण्याचा काळ 10-12 सेकंदांपर्यंत वाढवा.
स्नायू आत ओढून घेताना त्यावर सगळं लक्ष केंद्रित केल्याने फायदा होतो. पोटाचे किंवा नितंबाचे स्नायू आत ओढू नका. फक्त लघवी, योनीमार्ग आणि गुदद्वाराचे स्नायू ओढून धरा.
एका वेळी 10 आकुंचन-प्रसरण असं दिवसातून किमान तीन वेळा करा.


केगेल व्यायाम बसून, आडवं पडून, झोपून, कुशीवर झोपून कसेही करता येतात. इतर काम करत असतानाही ते करता येतात. गरोदर स्त्रिया बाळंतपणाच्या आधी आणि बाळंतपण झाल्यानंतर हे व्यायाम करू शकतात.
ज्यांना नकळत लघवी होण्याचा किंवा शिंक, खोकला आल्यावर काही प्रमाणात लघवी होण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा चांगला व्यायाम आहे.
4.2K views09:30
ओपन / कमेंट