Get Mystery Box with random crypto!

लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

टेलीग्राम चैनल का लोगो marathi_sex_diseases — लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕
टेलीग्राम चैनल का लोगो marathi_sex_diseases — लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕
चैनल का पता: @marathi_sex_diseases
श्रेणियाँ: स्वास्थ्य , प्रेमकाव्य
भाषा: हिंदी
ग्राहकों: 968
चैनल से विवरण

तुमच्या लैंगिक समस्या व त्यांचे समाधान...!
मुख्य चॅनेल - @sex_marathi

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-01-30 10:36:48 नमस्कार सर्वांचे,
सर्व प्रथम खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे की तूम्ही मदती साठी हात पुढे केलात.
.
काही महत्व निर्णय घेण्यात आले असून त्यावर मी खूप विचार केला आहे. या पुढे मी एकच चॅनल चालवणार असून, त्यावर फक्त आणि फक्त मराठी भाषेत लेख आणि माहिती टाकली जाईल. टेलिग्राम मधील टेकनोलोजी दिवसेन दिवस अधिका अधिक प्रणालीत तंत्रज्ञानाचा वापरून संभोग आणि कामसूत्र या शब्दाचे इंग्रजी शब्द शोधून ते चॅनल बंद करत आहेत.
.
आत्ता पर्यंत जशी तुम्ही मला साथ दिलीत तशीच साथ पुढे देखील देत राहाल अशी अपेक्षा ठेऊन मी हे पाऊल उचलत आहेत.

मालकीण बाईंचा एकमेव मराठी चॅनल
मराठी भाषेतून प्रौढ शिक्षण आणि ज्ञान
लिंक - https://t.me/+kspHMhU6CiQ4MjY1

लैंगिक समस्या आणि आजार हा चॅनल ३१ जानेवारी २०२२ रात्री बंद केला जाईल.
351 viewsedited  07:36
ओपन / कमेंट
2022-01-29 20:50:05 मराठी कामसूत्र चॅनला पोनोग्राफीचा नियम तोडल्या बद्दल बंदी घातली आहे.
तुमची मदत हवी आहे..
.
Marathi Kamsutra Channel is banned for violating pornography rules.
Need your help..
.
मराठी कामसूत्र पोर्नोग्राफी नियमों के उल्लंघन के लिए चैनल पर प्रतिबंध लगा दिया गया है।
आपकी मदद की जरूरत हैं
.
मालकीण बाई
257 views17:50
ओपन / कमेंट
2022-01-22 22:12:56
तुम्ही संभोग बद्दल दिवसातून किती वेळ विचार करता?
How many times a day do you think about intercourse?
दिन मैं कितनी बार आप संभोग के बारे मैं सोचते हो?
Anonymous Poll
8%
नाही करत विचार/ don't think about it
8%
1
8%
2
9%
3
7%
4
6%
5
26%
5 पेक्षा जास्त /More than 5
28%
खूप वेळ की मोजता येत नाही/ too many times that I don't remember numbers
635 voters151 views19:12
ओपन / कमेंट
2022-01-19 19:30:53 'कंडोम' प्रथम शब्दप्रयोग-
हे नाव कसे पडले याविषयी मतभेद आहेत. चार्ल्स (दुसऱ्या) याच्या काळात डॉ. कंडोम/कंटोन या फिजिशियनवरून हे नाव पडले. १७०६ मध्ये एका कवितेमध्ये 'कंडोम' या शब्दाचा वापर केला गेला. या काळात वाढलेल्या गुप्तरोगाला आळा घालण्यासाठी याचा खूप वापर केला जात होता.

नपुंसकत्वाची पहिली व्याख्या-
१८३३ व १८५८ च्या आवृत्तीमध्ये 'कोपलँडस् डिक्शनरी ऑफ प्रॅक्टिकल मेडिसिन' या शब्दकोशात नपुंसकत्वाची व्याख्या प्रथम प्रकाशित झाली. १९५० साली स्ट्रॉस यांनी 'संभोग' करण्यामधील कमकरता अशी व्याख्या केली. अन्सर्ट जोन्स (१९१८) विरुद्धलिंगी संभोगामध्ये पूर्ण अथवा थोडी ताठरता न येणे व अपेक्षित सुख न मिळणे याला नपुंसकत्व म्हणावे अशी व्याख्या केली.
564 views16:30
ओपन / कमेंट
2022-01-13 20:46:29
तुम्हाला कोरोना होऊन गेलाय/झालंय?
Do you ever have corona?
Anonymous Poll
23%
हो/yes
59%
नाही/no
18%
माहित नाही झाला असेल पण/ no sure
485 voters122 views17:46
ओपन / कमेंट
2022-01-13 19:31:09 स्त्रियांच्या लैंगिक समस्या

कामजीवनामध्ये स्त्री-पुरुषांत लैंगिक समस्या येऊ शकतात. परंतु बऱ्याचवेळा पुरुषांच्या नपुंसकत्व आणि शीघ्रवीर्यपतन या समस्यांवर जास्त बोलले जाते. परंतु स्त्रियांतही लैंगिक समस्या असतात.

कामवासनेचा अभाव असणे, कामपूर्ती मिळण्यास वेळ लागणे, कामपूर्तीचा अभाव, योनीआकर्ष, संभोगाच्या वेळी वेदना होणे या समस्यांचा समावेश होतो. या समस्यांमागे साधारण कारणे अशी असतात.

विवाहापूर्वी झालेल्या लैंगिक छळातून/संभोगातून आलेला वाईट अनुभव.

कामजीवनाविषयी शास्त्रीय माहिती न मिळाल्याने पती-पत्नीने एकमेकांना कामुक करण्यासाठी कसे तंत्र वापरावे याचे ज्ञान नसणे.

इच्छेविरुद्ध लग्न झालेले असेल तर पुढील व्यक्तीविषयी आकर्षणच निर्माण न होणे.

घरातील वाद, एकमेकांविषयी असलेला द्वेष यामुळे लैंगिक भावनेवर दुष्परिणाम होणे.

हे सर्व लैंगिक समस्या निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते.

शारीरिक कारणे -
योनीमार्गात जंतूबाधा असणे, मानसिक रोगांवर रक्तदाब व मधुमेह यावरील औषधोपचारांचा दुष्परिणाम परिणामी कामपूर्तीचा अभाव किंवा कामपूर्ती मिळण्यास वेळ लागतो. काही संप्रेरकांच्या दुष्परिणामाने वासना कमी होते व योनीमार्गातील ओलावा कमी होऊन संभोगात वेदना होतात. तसेच ल्युकोरिया (अंगावर पांढरे जाणे), निरोधाची ऍलर्जी - यात संभोगात वेदना होतात. कामजीवनातील तंत्र माहीत नसल्याने स्त्रीला कामोद्दीपित न करताच पुरुष संभोगाला प्रारंभ करतो. स्त्री संकोच करून पतीला सांगत नाही व ही तक्रार वर्षानुवर्षे राहते.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य ती तपासणी करून, प्रथम समस्येचे मूळ कारण शोधावे लागते. गरज पडली तर रक्त, लघवी तपासणी व योनीमार्गाची तपासणी करून निदान होते व त्यावर उपचार करताना कामवासना उद्दीपित व्हावी म्हणून कामपूर्ती मिळावी म्हणून शयनगृहातील तंत्र पती-पत्नीला शिकवावे लागते. या उपचार पद्धतीला 'सेक्स थेरपी' म्हणतात. यासाठी काहीवेळा कामुक चित्रपटाचा उपयोग करावा लागतो. विविध आसनांचा फायदा होत असल्याने त्यांचा उपयोग करावा लागतो. याला एक ते सहा महिने लागू शकतात. पती-पत्नी दोघांनी शयनगृहात एकमेकाला मदत केली; लैंगिक समस्येचे तज्ज्ञ सांगतात त्यानुसार वर्तन केले, तर नक्कीच स्त्रियांच्या समस्या पूर्ण नाहीशा होतात. स्त्रियांच्या समस्या त्या स्वतः पतीला सांगतील अशा भ्रमात राहू नये. संकोची स्वभावाने काही स्त्रीया स्वतःच्या लैंगिक जीवनाविषयी पतीशी बोलत नाहीत. त्यामुळे मूळ समस्या दीर्घकाल तशीच राहते. कामजीवनाचा अभ्यास केल्यानंतर आतापर्यंत काय चुकते हे लक्षात येते.

कोणामध्ये लैंगिक समस्या निर्माण झाली तर दोघांत सुसंवाद असणे गरजेचे असते, ते कामजीवनात घडत नाही, त्यामुळे मूग गिळून गप्प बसण्याची वेळ येते व तक्रार वाढत राहते. वैवाहिक आयुष्यात अडचणी येतात. यातूनच पुरुषाचा बाहेर संभोगसुख अनुभवण्याचा प्रकार सुरू होतो. थोडक्यात, जसे थंडी-ताप यासारख्या आजारात पती-पत्नी एकमेकाला मदत करतात, डॉक्टरांचा सल्ला घेतात, उपचार घेतात, तसेच लैंगिक समस्या निर्माण झाल्यावर घाबरून न जाता खऱ्या लैंगिक समस्या विशेषज्ञाकडे जाऊन समुपदेशन, उपचार घ्यावेत.
86 views16:31
ओपन / कमेंट
2022-01-09 19:30:58 Covid-19 विषाणूचा परिणाम Sperm count वरही, Erectile dysfunction चाही तीनपट धोका


ज्या पुरूषांना covid-19 विषाणूची लागण होते, अशा पुरूषांमध्ये erectile dysfunction ची म्हणजे पुरूषांच्या लैंगिक आयुष्याशी संबंधित अशी समस्या उद्भवण्याची शक्यता एका नव्या संशोधन अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे. रोमच्या विद्यापिठात संशोधनाचा भाग म्हणून डॉक्टरांनी १०० जणांना लैंगिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारले. त्यामध्ये सरासरी ३३ वयोगट असलेल्या पुरूषांचा समावेश होता. ज्या पुरूषांना लैगिंक आयुष्यात समस्या आहेत, अशाच पुरूषांची निवड या संशोधनासाठी करण्यात आली होती. संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या पुरूषांमध्ये ९ टक्के पुरूष असे होते, ज्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती, पण त्यांना लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पण त्यापैकी २८ टक्के पुरूष असे होते, ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली होती. अॅंड्रॉलॉजी या जर्नलच्या माध्यमातून हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर लंडनच्या अभ्यासानुसार पुरूषांच्या स्पर्म काऊंटवरही कोरोनाच्या विषाणूचा परिणाम होत असल्याचा अभ्यास समोर आला आहे.

संशोधनातील माहितीनुसार कोरोनाचा विषाणू संपुर्ण शरीरातील रक्त वाहिन्यांमध्ये परिणाम करतो. पुरूषांच्या लिंगाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या या अतिशय छोट्या आणि आखूड असतात. त्यामुळेच रक्तपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचाच परिणाम हा पुरूषांच्या लैंगिक आयुष्यावरही दिसून येतो. महिलांच्या तुलनेत पुरूषांना लैंगिक समस्येला सामोरे जावे लागत आहे ही समस्या नुकत्याच समोर आलेल्या काही संशोधनामधून समोर येत आहे. पुरूष हे महिल्यांच्या तुलनेत कोरोनाच्या विषाणूला अधिक सहजपणे बळी पडतात आणि पुरूषांमध्ये महिल्यांच्या तुलनेत मृत्यूचा दर हा १.७ टक्के असतो असेही संशोधनातून समोर आले आहे. पुरूषांमधील सेक्स हार्मोन्समध्ये ऑस्ट्रेजेन आणि टेस्टोजेनची पातळी कमी जास्त झाल्यानेही याचा परिणाम हा पुरूषांच्या लैंगिक आयुष्यावर दिसून येत आहे. परिणामी पुरूषांना प्रजनन क्षमतेदरम्यान महत्वाच्या अशा erectile dysfunction च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे तीन पटीने या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे पुरूषांनी मांडलेल्या प्रतिसादामधून समोर आले आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनानुसार पुरूषांच्या तुनलेत महिलांना कोरोना नसतानाच्या काळातही अधिक आयुष्यमान आहे. त्यासाठी मुख्यत्वेकरून महिलांची इम्युनिटी आणि ऑस्ट्रेजेन या गोष्टी कारणीभूत आहे. याच गोष्टींचा फायदा हा ह्दय सुदृढ ठेवण्यासाठी होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. पण पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन सिस्टिम ही कार्डिओवस्क्युलर सिस्टिमवर कोरोना व्हायरचा प्रभाव मोठा असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. कार्डिओवस्क्युलर सिस्टिम ही आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी महत्वाची अशी शरीरातील रचना आहे. कोरोनाच्या विषाणुमुळे या संपुर्ण यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याचे समोर आले आहे.

पुरूषांच्या Sperm count वर होतोय परिणाम
इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनानुसार सेक्स हार्मोन्सच्या निर्मितीवरच कोरोना व्हायरस हावी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना व्हायरसचा शरीरात शिरकाव झाल्यानंतर केवळ फुफ्फुसांनाच तो हानी पोहचवत नाही तर पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे, लंडनच्या हॅमरस्मिथ हॉस्पिटलच्या रिप्रॉक्टिव्ह एन्डोक्रिनोलॉजी आणि एन्ड्रॉलॉजी विभागाच्या सल्लागार डॉ छन्ना जयसेना यांनी ही माहिती डेलिमेल युकेसाठी ही माहिती दिली आहे. कोरोनाचा शिरकाव शरीरात झाल्यानंतर फक्त फुफ्फुसापुरता तो मर्यादित न राहता शरीराच्या अनेक भागांवर त्याचा परिणाम होतो. परिणामी पुरूषांमध्ये टेस्टोरॉनचे प्रमाण कमी होणे, महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम होणे आणि मेनोपॉजसारखी समस्या ही महिलांच्या बाबतीत आढळून आली आहे. एकुणच आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवरही याचा परिणाम आढळून आला आहे.

कोरोना व्हायरस हा सेक्स हार्मोन्सचे प्रमाण कमी करण्यासाठी इतर कोणत्याही इन्फेक्शनच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरला आहे, असा कोणताही सबळ पुरावा अजुनही आढळलेला नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्याने जर सेक्स हार्मोन्सचे प्रमाण कमी होत असेल तर ही गोष्ट तात्पुरत्या कालावधीसाठीची असू शकेल असे मत डॉ जयसेना यांनी व्यक्त केले आहे. जेव्हा कोणताही फ्लू होतो तेव्हा संपुर्ण शरीर पूर्ववत असे काम करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो. फ्लू च्या कालावधीत पुरूषांचा स्पर्म काऊंट हा शून्यावर जातो. त्यानंतर किमान तीन महिने हा स्पर्म काऊंट पूर्ववत होण्यासाठीचा कालावधी लागतो. त्यामुळे कोरोनामुळेही शरीरातील प्रजनन क्षमतेवर झालेला परिणाम पाहता त्याच्या रिकव्हरीसाठीही अधिक कालावधी लागू शकतो असे डॉ जयसेना यांचे म्हणणे आहे.
324 views16:30
ओपन / कमेंट
2022-01-06 18:40:38 तुमच्या कडे काही उपयुक्त माहिती असल्यास मला @Submiturwork_bot वर नक्की पाठवा..
तुमचे प्रश्न किंवा समस्या मला विचरण्या साठी मला @malkinbai_bot वर संपर्क साधावा.
तुमचे उत्तर तुम्हाला प्रत्येक रात्री मिळेल.
.
तुमचीच मालकीण बाई..
407 views15:40
ओपन / कमेंट