Get Mystery Box with random crypto!

अनेक गर्भनिरोधक साधनांप्रमाणे कॉपर-टी मुळे देखील अनावश्यक गर्भ | लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

अनेक गर्भनिरोधक साधनांप्रमाणे कॉपर-टी मुळे देखील अनावश्यक गर्भधारणेचा धोका नसल्याने असल्याने तुम्हाला सेक्सलाईफचा व्यवस्थित आनंद घेता येतो.काही महिलांना सेक्स करताना कॉपर-टीच्या दो-याचा अडथळा होईल अशी भीती वाटते पण हा दोरा तुमच्या योनीमार्गाच्या वरच्या भागात असल्याने सेक्स करताना तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला त्याचा त्रास होत नाही.

९. कॉपर-टी पेक्षा गर्भनिरोधक गोळ्या घेणे फायद्याचे ठरते का?

प्रत्येक गर्भनिरोधक साधनांचे काही चांगले व वाईट परिणाम असतात.मात्र कॉपर-टी मुळे तुमच्या हॉर्मोनल सायकलवर कोणताही प्रत्यक्ष दुष्पपरिणाम होत नसल्याने ते एक सुरक्षित गर्भनिरोधक साधन आहे.

१०. कॉपर-टी मुळे गंभीर पाठदुखी होते का?

कॉपर-टी मुळे पाठदुखी होत नाही.प्रसुतीपुर्व चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे मणक्यातील स्नायू सरकल्यास किंवा कॅल्शियम आणि विटामिन डी च्या कमतरतेमुळे पाठदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते.