Get Mystery Box with random crypto!

स्रियांचे गर्भ निरोधक पद्धत...' कोपर्टी ' डॉ.बंदीता सिन्हा नव | लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

स्रियांचे गर्भ निरोधक पद्धत..." कोपर्टी "

डॉ.बंदीता सिन्हा
नवी मुंबईतील एस.डी.डी हॉस्पिटलच्या
consultant obstetrician and gynaecologist. यांचा हा महत्वाचा सल्ला जरुर वाचा.


भारतामध्ये गर्भनिरोधनाच्या साधनांमध्ये कॉपर-टी चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो.कारण या साधनामुळे गर्भधारणा पाच वर्षे पुढे ढकलण्यास मदत होते.काही जणींना तर दहा वर्षे देखील कोणत्याही त्रासाविना या साधनाचा फायदा होऊ शकतो.मात्र अनेक तज्ञ डॉक्टर महिलांना कॉपर-टी बसवण्याचा सल्ला मुले झाल्यानंतरच देतात. संततीनियमनाच्या या पद्धतीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असू शकतात.

१. कोणत्याही सेक्शूअली अ‍ॅक्टीव्ह महिलेला कॉपर-टी बसवता येते का?

फक्त आई न झालेल्या महिला व मुलींनाच कॉपर-टी न बसवण्याचा सल्ला दिला जातो.कारण प्रेगन्सीमध्ये स्त्रीच्या शरीरात अनेक शारीरिक व हॉर्मोनल बदल होतात.गर्भारपणात गर्भाशयाची वाढ होते तर प्रसुती दरम्यान गर्भाशयाचे मुख नैसर्गिकरित्या मोठे होते.या सर्व गोष्टींमुळे प्रसुती झालेल्या महिलेच्या गर्भाशयामध्ये योनीमार्गातून कॉपर-टी बसवणे सोपे जाते.मात्र प्रसुती न झालेल्या महीलेने कॉपर-टी बसवली तर तिच्या गर्भाशयाला दुखापत होण्याची शक्यता अधिक असते.ज्यामुळे पुढे त्या स्त्रीला कायमस्वरुपी वंधत्व येण्याचा धोका असतो.त्यामुळे तज्ञ अशा महीलांना कॉपर-टी न बसवण्याचा सल्ला देतात.

२. सिझेरियन प्रसुती झालेल्या महिलेला कॉपर-टी बसवण्याचा सल्ला दिला जातो का?

नैसर्गिक प्रसुती असो की सिझेरियन प्रसुती बाळ झालेल्या आईला कॉपर-टी बसवण्याचा सल्ला दिला जातो.सिझेरीयन डिलीव्हरी झालेल्या महिलांना प्रसुतीनंतर चार ते सहा आठवडयांनंंतर कॉपर-टी बसवण्यात येते.

३. कॉपर-टी बसवल्यानंतर पाच वर्ष अनावश्यक गर्भधारणा टाळता येते का?

कॉपर-टी बसवल्यानंतर पाच वर्ष अनावश्यक गर्भधारणा नक्कीच टाळता येते.मात्र एकदा कॉपर-टी बसवली की कधीच डॉक्टरकडे जावे लागत नाही असे नाही.कॉपर-टी बसवल्यानंतर पहिल्यांदा येणा-या मासिक पाळी दरम्यान तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट कडे जाणे गरजेचे असते.तुमचे डॉक्टर कॉपर-टी योग्य ठिकाणी बसली आहे का हे तपासतात.एक महिना जर कॉपर-टी व्यवस्थित बसली असेल तर पुढील पाच वर्ष ती सुरक्षित राहू शकते.असे असले तरी दर वर्षी तुम्ही अधिक सुरक्षेसाठी याबाबतीत डॉक्टरांकडे चेकअप साठी जाणे आवश्यकच आहे.

४. या गर्भनिरोधनाच्या साधनामधील दो-याचा त्रास स्त्रीला होण्याची शक्यता आहे का?

कॉपर-टीच्या दो-याचा त्रास होत नाही.मात्र जर तुम्ही व्हर्जायना स्वच्छ करताना तो ओढण्याचा प्रयत्न केलात तर सहाजिकच त्रास होऊ शकतो.हा दोरा डॉक्टरांना कॉपर-टी योग्य ठिकाणी बसली आहे का हे तपासण्यासाठी व ती काढायची वेळ झाली आहे हे समजण्यासाठी बाहेर सोडण्यात आलेला असतो.

या दो-याचा तुमच्या शरीरावर व इतर कोणत्याही गोष्टींवर विपरित परिणाम होत नाही.जर तुम्हाला त्या दो-याची अडचण होत असेल तर तो दोरा पुन्हा योनीमार्गातून आत कसा ढकलायचा याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.पण या परिस्थितीत जर तो जास्त आत गेला तर कॉपर-टी काढताना तो शोधण्यासाठी ऑल्ट्रा सोनोग्राफी करण्याची आवश्यकता भासू शकते.त्यामुळे याबाबत असणा-या तुमच्या शंकाचे निरसन करण्यासाठी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

५. कॉपर-टी बसवल्यानंतर प्रेगन्ट होणे शक्य आहे का?

कॉपर-टी मधील तांबे या घटकामुळे तीच्या संपर्कात येणारे शुक्राणू नष्ट होतात.त्यामुळे कॉपर-टी बसवल्यानंतर गर्भधारणा होण्याची शक्यता खुप कमी असते.पण जर हे साधन गर्भाशयाच्या आतील बाजूस सरकले असेल तर कदाचित गर्भधारणा होण्याची शक्यता असू शकते.यासाठीच कॉपर-टी च्या दो-याला सतत हात लावू नये.जर तो दोरा सैल झाला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर त्वरीत तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट कडून याबाबत उपचार करुन घ्या.

६. कॉपर-टी मुळे स्त्री जाड होते का?

ब-याच स्त्रीयांना कॉपर-टी बसवल्यानंतर त्या जाड होतील असे वाटते पण हे खरे नाही.कॉपर-टी चा व तुमच्या जाडपणाचा काहीच संबध नाही.पुरेसा व्यायाम न केल्याने,आहारात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट व फॅटस घेतल्याने किंवा प्रसुतीनंतर येणा-या ताणामुळे महिला जाड होतात. 

७. कॉपर-टी कोणत्याही वेळी बसवण्यात येते का?

जर तुम्ही प्रसुतीनंतर संततीनियमन करण्यासाठी कॉपर-टी बसवत आहात तर तुम्ही हे साधन कधी बसवत आहात हे खुप महत्वाचे ठरते.IUD च्या नवीन नियमांनुसार हे साधन नॉर्मल डिलीव्हरी नंतर लगेच बसवणे गरजेचे आहे.मात्र सिझेरियन डिलीव्हरी नंतर यासाठी चार ते सात आठवडे वाट पाहण्याची गरज आहे.त्यानंतर तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या चौथ्या,पाचव्या किंवा सहाव्या दिवशी हे साधन बसवू शकता.या दिवसांमध्ये कॉपर-टी बसवणे सहज सोपे असते.परंतू त्यानंतर थोडे स्पॉटींग होण्याची शक्यता आहे.

८. कॉपर-टीचा सेक्सलाईफ वर काय परिणाम होतो?