Get Mystery Box with random crypto!

हॉटेलच्या बाहेर आम्ही एक टॅक्सी पकडली आणि त्या ठिकाणापासून दहा | Marathi Sex Katha | मराठी सेक्स कथा [MSK]

हॉटेलच्या बाहेर आम्ही एक टॅक्सी पकडली आणि त्या ठिकाणापासून दहा-बारा किलोमीटर दूर असलेल्या एका जंगलाच्या ठिकाणी आलो. तेथे आम्ही टॅक्सी सोडून दिली आणि मग मुख्य रस्त्यावरून बाजूला जंगलात शिरलो. पाय वाटेने आम्ही जंगलात दरमजल करत चालू लागलो... गप्पा मारत, गाणी म्हणत आजुबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही चालत होतो. नंतर मग पायवाट संपली आणि आम्ही कंपासने अंदाज घेत आत जंगलात चालू लागलो...

जंगलाच्या आतल्या त्या भागात मनुष्याची वर्दळ नव्हतीच. फक्त आमच्यासारखेच कोणी हायकर-ट्रेकर त्या भागात जात असत... आता पण खरे तर हा हायकींग-ट्रेकींगचा सिझन नव्हता तेव्हा आम्ही बहुतेक एकटेच त्या भागात होतो... अजूनपर्यंत तरी आम्हाला कोणी भेटले नव्हते... अर्थात! आम्हाला अश्या ट्रेकींगची सवय होती तेव्हा घाबरण्याचा काही प्रश्न नव्हता. आणि आमच्याकडे ट्रेकींगचा मॅप असल्याने चुकण्याचीही काही शक्यता नव्हती. तेव्हा आम्ही निर्धोकपणे ट्रेकींग एंजॉय करत पुढे जात होतो...

मग आम्ही एका डोंगराच्या पायथ्याशी पोहचलो... साधारण तासभर आम्ही चालत होतो. मग सॅक काढून ठेवून आम्ही एका झाडाखाली बसलो आणि थोडी विश्रांती घेतली. आधी काही क्षण आम्ही एकमेकांच्या मिठीत बसून राहिलो. अमृता चालून थोडी दमली होती आणि तिचा चेहरा लाल झाला होता. गरमीचे दिवस असल्याने आम्ही घामाघूम झालो होतो. मग अमृता माझ्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ पडून राहिली... नंतर ती ताजीतवानी झाली आणि उठली. मग आम्ही थोडे खावून घेतले... गप्पा मारत, हसत-खेळत आम्ही थोडा वेळ थांबलो आणि पुढच्या सफरीवर निघालो...

आता आम्ही तो डोंगर चढायला सुरुवात केली. कित्येकदा मला अमृताला हात देवून आधार देत वर घ्यावे लागायचे. असे डोंगर चढणे म्हणजे एक वेगळाच रोमांचकारक अनुभव असतो आणि आम्हा दोघांनाही हा एक्साइटींग अनुभव घ्यायला आवडायचे. म्हणूनच आम्ही दोघे फक्त अश्या ॲडवेंचरस हायकींग करत असू... तो डोंगर चढताना आम्हाला कोणी मन्युष तर दूर पण एखादा प्राणीही आढळला नाही... टॅक्सी ड्रायव्हरला आम्ही मेनरोडवर सोडले त्यानंतर आत्तापर्यंत एकही माणूस आमच्या नजरेस पडला नव्हता. जरी त्या डोंगरावर झाडेझुडपे होती पण म्हणावा तसा गारवा लागत नव्हता व गरमच होत होते... त्यात आम्ही वर चढत असल्याने दमछाक होत होती आणि आम्ही घामाने भिजलो होतो... पण मध्येच असे कोठे थांबणे योग्य नव्हते तेव्हा आम्ही एकमेकांचा आधार घेत वर चढतच राहिलो...

साधारण पुन्हा तासभर वर चढल्यानंतर आम्ही त्या डोंगराच्या एका छोट्या पठारावर आलो... तेथून आजुबाजूच्या परिसराचे नयनरम्य दॄश्य दिसत होते आणि तो देखावा पाहून आम्ही दोघेही हरखून गेलो!... सॅक काढून एका खडकाजवळ ठेवून मी पटकन कॅमेरा काढला व त्या परिसराचे फोटो काढायला लागलो... अमृता बाजुच्या एका खडकावर बसली होती व दम घेत होती. त्या देखाव्याच्या पार्श्वभुमीवर मी तिचेही काही फोटो काढले... माझे फोटोसेशन झाल्यावर मी तिच्या बाजूला जावून त्या खडकावर बसलो.

"अनिकेत तुला पाण्याचा आवाज येतोय का रे?" अमृताने कानोसा घेत मला विचारले. मग मी कानोसा घेतला आणि म्हणालो,

"हो ग... येतोय खरा... एखादा झरा वगैरे असावा.... थांब मी बघतो..."

असे म्हणून मी त्या पठाराच्या दुसऱ्या बाजूला गेलो.. जसे जसे त्या कडेला मी जावू लागलो तसे पाण्याचा आवाज जास्त मोठा होत गेला... जेव्हा दुसऱ्या बाजूला पोहचलो तेव्हा मला अचानक एका घळीत पाण्याचा एक छोटा धबधबा दिसला!... मी आनंदाने ओरडून अमृताला म्हणालो,

"अमृताऽऽऽ... लवकर इकडे ये.... बघ येथे धबधबा आहे... व्हाट ब्युटी!..."

अमृता धावत आली आणि ती पण तो धबधबा बघून हरकून गेली... मी पटकन पळालो आणि माझी सॅक पाठीवर घेत अमृताची सॅक घेतली आणि भरभर चालत तिच्याजवळ आलो. तिची सॅक तिच्या पाठीवर टाकून मी पुढे चालायला लागलो... थोडासा चढ चढून आम्ही काही खडकांच्या मागे त्या धबधब्याजवळ गेलो... बाजूच्या दोन खडकामध्ये आम्ही आमच्या सॅक ठेवल्या आणि तेथून समोरील दरीचा सीन न्याहाळू लागलो... तेथून आजुबाजूच्या परीसराचा देखावा अजूनच लक्षवेधक दिसत होता! भान हरपून आम्ही तो देखावा पहात होतो...

सगळ्यात आधी मी भानावर आलो आणि मी धबधब्याकडे पाहिले. धबधब्याचे ते फेसाळणारे फ्रेश पाणी अंगावर घ्यायची उर्मी माझ्या मनात आली... तसेही घामाने आम्ही भिजलो होतो तेव्हा अंग चिकट झाले होते. आणि त्यात प्रचंड गरम होत होते तेव्हा थंड पाण्याने फ्रेश वाटेल असे मला वाटले... तेव्हा मी कसलाही विचार न करता भराभर कपडे काढायला सुरुवात केला. माझे टि-शर्ट आणि कार्गो पॅन्ट काढून मी फक्त अंडरवेअर अंगावर ठेवली आणि धावत पळत वर त्या धबधब्या खाली गेलो....