Get Mystery Box with random crypto!

'कंडोम' प्रथम शब्दप्रयोग- हे नाव कसे पडले याविषयी मतभेद आहेत. | लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

'कंडोम' प्रथम शब्दप्रयोग-
हे नाव कसे पडले याविषयी मतभेद आहेत. चार्ल्स (दुसऱ्या) याच्या काळात डॉ. कंडोम/कंटोन या फिजिशियनवरून हे नाव पडले. १७०६ मध्ये एका कवितेमध्ये 'कंडोम' या शब्दाचा वापर केला गेला. या काळात वाढलेल्या गुप्तरोगाला आळा घालण्यासाठी याचा खूप वापर केला जात होता.

नपुंसकत्वाची पहिली व्याख्या-
१८३३ व १८५८ च्या आवृत्तीमध्ये 'कोपलँडस् डिक्शनरी ऑफ प्रॅक्टिकल मेडिसिन' या शब्दकोशात नपुंसकत्वाची व्याख्या प्रथम प्रकाशित झाली. १९५० साली स्ट्रॉस यांनी 'संभोग' करण्यामधील कमकरता अशी व्याख्या केली. अन्सर्ट जोन्स (१९१८) विरुद्धलिंगी संभोगामध्ये पूर्ण अथवा थोडी ताठरता न येणे व अपेक्षित सुख न मिळणे याला नपुंसकत्व म्हणावे अशी व्याख्या केली.