Get Mystery Box with random crypto!

स्त्रियांच्या लैंगिक समस्या कामजीवनामध्ये स्त्री-पुरुषांत लैं | लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

स्त्रियांच्या लैंगिक समस्या

कामजीवनामध्ये स्त्री-पुरुषांत लैंगिक समस्या येऊ शकतात. परंतु बऱ्याचवेळा पुरुषांच्या नपुंसकत्व आणि शीघ्रवीर्यपतन या समस्यांवर जास्त बोलले जाते. परंतु स्त्रियांतही लैंगिक समस्या असतात.

कामवासनेचा अभाव असणे, कामपूर्ती मिळण्यास वेळ लागणे, कामपूर्तीचा अभाव, योनीआकर्ष, संभोगाच्या वेळी वेदना होणे या समस्यांचा समावेश होतो. या समस्यांमागे साधारण कारणे अशी असतात.

विवाहापूर्वी झालेल्या लैंगिक छळातून/संभोगातून आलेला वाईट अनुभव.

कामजीवनाविषयी शास्त्रीय माहिती न मिळाल्याने पती-पत्नीने एकमेकांना कामुक करण्यासाठी कसे तंत्र वापरावे याचे ज्ञान नसणे.

इच्छेविरुद्ध लग्न झालेले असेल तर पुढील व्यक्तीविषयी आकर्षणच निर्माण न होणे.

घरातील वाद, एकमेकांविषयी असलेला द्वेष यामुळे लैंगिक भावनेवर दुष्परिणाम होणे.

हे सर्व लैंगिक समस्या निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते.

शारीरिक कारणे -
योनीमार्गात जंतूबाधा असणे, मानसिक रोगांवर रक्तदाब व मधुमेह यावरील औषधोपचारांचा दुष्परिणाम परिणामी कामपूर्तीचा अभाव किंवा कामपूर्ती मिळण्यास वेळ लागतो. काही संप्रेरकांच्या दुष्परिणामाने वासना कमी होते व योनीमार्गातील ओलावा कमी होऊन संभोगात वेदना होतात. तसेच ल्युकोरिया (अंगावर पांढरे जाणे), निरोधाची ऍलर्जी - यात संभोगात वेदना होतात. कामजीवनातील तंत्र माहीत नसल्याने स्त्रीला कामोद्दीपित न करताच पुरुष संभोगाला प्रारंभ करतो. स्त्री संकोच करून पतीला सांगत नाही व ही तक्रार वर्षानुवर्षे राहते.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य ती तपासणी करून, प्रथम समस्येचे मूळ कारण शोधावे लागते. गरज पडली तर रक्त, लघवी तपासणी व योनीमार्गाची तपासणी करून निदान होते व त्यावर उपचार करताना कामवासना उद्दीपित व्हावी म्हणून कामपूर्ती मिळावी म्हणून शयनगृहातील तंत्र पती-पत्नीला शिकवावे लागते. या उपचार पद्धतीला 'सेक्स थेरपी' म्हणतात. यासाठी काहीवेळा कामुक चित्रपटाचा उपयोग करावा लागतो. विविध आसनांचा फायदा होत असल्याने त्यांचा उपयोग करावा लागतो. याला एक ते सहा महिने लागू शकतात. पती-पत्नी दोघांनी शयनगृहात एकमेकाला मदत केली; लैंगिक समस्येचे तज्ज्ञ सांगतात त्यानुसार वर्तन केले, तर नक्कीच स्त्रियांच्या समस्या पूर्ण नाहीशा होतात. स्त्रियांच्या समस्या त्या स्वतः पतीला सांगतील अशा भ्रमात राहू नये. संकोची स्वभावाने काही स्त्रीया स्वतःच्या लैंगिक जीवनाविषयी पतीशी बोलत नाहीत. त्यामुळे मूळ समस्या दीर्घकाल तशीच राहते. कामजीवनाचा अभ्यास केल्यानंतर आतापर्यंत काय चुकते हे लक्षात येते.

कोणामध्ये लैंगिक समस्या निर्माण झाली तर दोघांत सुसंवाद असणे गरजेचे असते, ते कामजीवनात घडत नाही, त्यामुळे मूग गिळून गप्प बसण्याची वेळ येते व तक्रार वाढत राहते. वैवाहिक आयुष्यात अडचणी येतात. यातूनच पुरुषाचा बाहेर संभोगसुख अनुभवण्याचा प्रकार सुरू होतो. थोडक्यात, जसे थंडी-ताप यासारख्या आजारात पती-पत्नी एकमेकाला मदत करतात, डॉक्टरांचा सल्ला घेतात, उपचार घेतात, तसेच लैंगिक समस्या निर्माण झाल्यावर घाबरून न जाता खऱ्या लैंगिक समस्या विशेषज्ञाकडे जाऊन समुपदेशन, उपचार घ्यावेत.