Get Mystery Box with random crypto!

जननेंद्रियांची स्वच्छता कशी करावी ? वाढते प्रदूषण व त्याचा त् | लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

जननेंद्रियांची स्वच्छता कशी करावी ?

वाढते प्रदूषण व त्याचा त्वचेवर, केसांवरील होणारा परिणाम ह्यामुळे नियमित अंघोळ करणे महत्वाचे आहे. प्रत्येकजण स्वच्छ अंघोळ करताना नाक, कान, डोळे, हात स्वच्छ ठेवतो. परंतु लिंग, गुदद्वाराच्या स्वच्छतेकडे म्हणावे तसे पहात नाही. ज्यामुळे शिश्नमल साठणे, जांघेमध्ये भुरशीचा आजार निर्माण होणे (ज्याला ग्रामीण भाषेत 'उष्णता' हा शब्द प्रचलित आहे.) हे घडते. याला कारण आहे लहानपणी पालकांकडून 'चूप बस गधड्या तिथे हात लावायचा नाही' असा चुकीचा सल्ला दिला जातो. यातूनच लिंग व गुदद्वार की त्या अवयवांतून मूत्र व मलविसर्जन होते ती जागा घाण आहे अशी शिकवणूक मिळते व तीच शिकवणूक पिढ्यानपिढ्या पुढे जाते.

स्वच्छतेचे नियम -
रोज अंघोळ करताना पुरुषाने स्वतःच्या लिंगावरील कातडे मागे सरकावून त्यावर साठलेला शिश्नमल साबण लावून, कोमट पाण्याने धुवून काढावा.

यासाठी कोणताही अतितिव्रतेचा साबण वापरू नये. कारण शिश्नमुंडावरील त्वचा पातळ असते. इजा होण्याची शक्यता असते.

नंतर कोरड्या टॉवेलने हलकेच टिपून घ्यावे. नंतर शिश्नमुंडावरील त्वचा पुढे सरकावून ठेवावी.

पुरुष जननेंद्रियाच्या जवळील केस वाढवावे की कमी करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. घामाचा त्रास होत असेल तर केस कमी ठेवणे योग्य आहे.

स्त्री जननेंद्रियांची स्वच्छता ठेवताना स्त्रीने बृहतभगोष्ठ, लघुभगोष्ठ व भगशिश्नीका यांची स्वच्छता राखावी. जास्त करून भगशिश्नीकेवरील त्वचा मागे करून त्यावरील साठलेला मल धुवून काढावा.

योनीमार्गात साबणाने स्वच्छता करणे टाळावे. कारण यात शरीरास हितकारक असे जंतू असतात जे साबण वापरल्याने नष्ट होऊ शकतात. त्यामुळे योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.