Get Mystery Box with random crypto!

सुंता शिश्नाच्या पुढील भागावरील सैल त्वचा (प्रिप्युस) शस्त्रक | लैंगिक आजार आणि त्यांची लक्षणे | Sex Diseases and it's symptoms 👩‍⚕

सुंता

शिश्नाच्या पुढील भागावरील सैल त्वचा (प्रिप्युस) शस्त्रक्रियेद्वारे काढून शिश्नमुंड उघडे करण्याच्या पद्धतीला सुंता असं म्हणतात. सुंता करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –circumcision

1.शिश्नमुंडाच्या खालील भागात मळ साचून राहत नाही त्यामुळे शिश्नमुंड स्वच्छ राहते. त्याला कसलाही वास येत नाही.

2. शिश्नमुंडावरील पातळ त्वचेवर बारीक सारीक इजा होण्याचा धोका टळतो. एचआयव्ही संसर्ग व लैंगिक संबंधांद्वारे पसरणारे इतर आजार होण्याचा धोका सुंता केलेल्या व्यक्तींमध्ये कमी प्रमाणात असतो असं शास्त्रीय पुराव्यानुसार दिसून आलं आहे.

3. बालवयापासून शिश्नमुंडावरील त्वचा मागे सरकत नसेल किंवा काही स्थानिक जंतुसंसर्गामुळे जननेंद्रियावर सूज आली असेल किंवा लैंगिक संबंधांद्वारे पसरणाऱ्या आजारांमुळे मागे गेलेली त्वचा पुढे येत नसेल तर अशा व्यक्तींमध्ये सुंता करणं आवश्यक ठरतं.

सुंता करण्याचे काही तोटे नाहीत. मात्र कोणतीही जंतुलागण टाळायची असेल तर निर्जंतुक केलेली उपकरणंच वापरली पाहिजेत. स्वच्छ व निर्जंतुक जागीच शस्त्रक्रिया करायला पाहिजे. ही काळजी घेतली तर सुंता करण्याचे काही तोटे होत नाहीत.